आनंदवार्ता! मॉन्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याने दिली गुड न्यूज; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
तापमानाचा पारा अंगाची लाहीलाही करत असताना सर्वांच्या नजरा पावसाच्या आगमनाकडे लागल्या होत्या. धरणातील पाणीही संपत चालल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य लोकंही चातकाप्रमाणे पावसाची वाट पहात होते. आता हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असून 8 ते 10 जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचणार आहे.
नैऋत्य मोसमी मॉन्सूनने केरळमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्य हिंदुस्थानच्या बहुतांश भागांत मॉन्सून दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने गुरुवारी सकाळी ट्वीट करत दिली.
Southwest Monsoon has set in over Kerala and advanced into most parts of Northeast India today, the 30th May, 2024.@moesgoi @KirenRijiju @Ravi_MoES @ndmaindia @WMO @DDNational @airnewsalerts @PMOIndia
— India Meteorological Department (@Indiametdept) May 30, 2024
दरम्यान प्रत्येक वर्षी मॉन्सून 1 जून रोजी केरळमध्ये डेरेदाखल होतो. मात्र यंदा मॉन्सून 31 रोजी केरळमध्ये प्रवेश करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र या अंदाजाला हुल देत मॉन्सून एक दिवस आधीच केरळमध्ये पोहोचला. आता 8 ते 10 जून दरम्यान मॉन्सून महाराष्ट्र येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List