महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच! – विजय वडेट्टीवार

महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच! – विजय वडेट्टीवार

 

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे आत्महत्या सुरु असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर दाभाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे वय 52 वर्ष यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एका खाजगी बँकेकडे चार महिन्या पूर्वी शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली असता बँकेने शेती गहाण ठेवून चार पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यासाठी टाळाटाळ करत राहिले. त्यामुळे निराश होऊन दाभाडे या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. विठ्ठल दाभाडे यांनी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहली असून यामध्ये बँक मॅनेजर पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे. आता मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे. कर्ज मंजूर होऊन तब्बल चार महिने कर्जाची रक्कम खात्यात टाकली नाही, असे या चिट्ठीत म्हटले आहे.बँक मॅनेजर आणि एजंट पैसे मागत असल्याची देखील तक्रार दाभाडे कुटुंबीयांची आहे.

हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचे हे अपयश आहे. सरकारने या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;