ऑल आईज ऑन राफा
इस्रायलच्या लष्कराने रविवारी गाझा पट्टीतील राफा येथील निर्वासितांच्या छावणीवर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 45 पॅलेस्टिनी ठार झाले. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेचा जगभरात निषेध होत आहे. अनेक मानवाधिकार कार्यकर्ते व संघटनांनी आवाज उठवला आहे. अशातच सोशल मीडियावर ‘ऑल आईज ऑन राफा…’ हा ट्रेंड सुरू झालाय. मराठी – हिंदी कलाकारांनीही ‘ऑल आईज ऑन राफा…’ चा पह्टो शेअर करून मोहिमेला पाठिंबा दर्शवला.
गाझा पट्टीतील निर्वासित लोक इस्रायलच्या भूमीत राफा येथे आश्रयाला आहेत. इस्रायलने राफामध्ये काही ठिकाणांना सुरक्षित म्हणून घोषित केले होते. त्यामुळे अनेकांनी राफामध्ये आश्रय घेतलाय. या छावण्यांमध्ये 15 लाख निर्वासित आहेत. या छावण्यांमध्ये हमासच्या कमांडरसह अनेक अतिरेकी लपून बसल्याची गुप्त माहिती इस्रायलच्या लष्कराला मिळाली होती. त्यानंतर इस्रायलने राफा येथे हवाई हल्ले केले. त्यामुळे छावण्यांतील कित्येक तंबूंना आग लागली. अनेक नागरिक जखमी झाले तर 45 जण ठार झाले. या घटनेनंतर काही तासांतच छावण्यांचा पह्टो आणि त्यावर ‘ऑल आईज ऑन राफा ’ मजकूर जगभरात व्हायरल झाला. राफा येथील निर्वासितांच्या छावण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांनी मोहीम सुरू केली.
फोटो खरा आहे का?
‘ऑल आईज ऑन राफ’च्या फोटो च्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मोहिमेसाठी एआय इमेज तयार केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अवघ्या 24 तासांत 2 कोटी 90 लाख लोकांनी इन्स्टाग्रामवर हा पह्टो शेअर केला. सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱया या पह्टोकडे शांतीचे आणि न्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जातेय.
सेलिब्रेटींचा पाठिंबा
‘ऑल आईज ऑन राफा’ पह्टो मंगळवारपासून इन्स्टाग्रामवर ट्रेंड होतोय. आलिया भट, करिना कपूर, प्रियांका चोप्रा, रश्मिका मंदाना, सोनाक्षी सिन्हा, समंथा रुथ, दिया मिर्झासह अनेक कलाकारांनी हा पह्टो शेअर केला. क्रिकेटपटू रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह हिने हा पह्टो शेअर केल्यानंतर ती वादाच्या भोवऱयात सापडली. तुम्ही सोयीनुसार भूमिका मांडता असे म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केले. त्यानंतर अवघ्या काही तासांत रितिकाने ही पोस्ट डिलीट केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List