स्पीडब्रेकर रंगविणे अभियानाचा जागतिक रेकॉर्ड; सांगलीच्या दीपक चव्हाण यांचा‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ने केला ‘अचिव्हर’ म्हणून सन्मान

स्पीडब्रेकर रंगविणे अभियानाचा जागतिक रेकॉर्ड; सांगलीच्या दीपक चव्हाण यांचा‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ने केला ‘अचिव्हर’ म्हणून सन्मान

महापालिकेचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने राबविलेल्या ‘स्पीडब्रेकर रंगविणे’ अभियानाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे. त्यांनी एका महिन्यात 340 स्पीडब्रेकर रंगवून जागतिक रेकॉर्ड केला आहे. यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉडसकडून त्यांचा ‘अचिव्हर’ म्हणून सन्मान करण्यात आला. ‘इंडिया बुक’कडून याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली.

दीपक चव्हाण यांनी मार्च ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत सांगली-मिरज-कुपवाड शहर आणि उपनगर, तसेच आजूबाजूच्या खेडेगावात रस्त्यावरील स्पीडब्रेकरना स्वतःच्या खर्चाने पांढरे सुरक्षापट्टे मारून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या एक महिन्याच्या काळात त्यांनी 340 स्पीडब्रेकर दिवस-रात्र रंगविले आहेत. यासाठी त्यांना 30 ते 35 हजारांचा खर्च आला आहे. या त्यांच्या उपक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. ‘इंडिया बुक’कडून त्यांच्या कामाची संपूर्ण माहिती घेत स्पीडब्रेकर रंगविण्याचे रेकॉर्ड झाल्याचे सांगितले आहे.

इंडिया बुककडून नुकतेच दीपक चव्हाण यांनी एक महिन्यात 340 स्पीडब्रेकर रंगविण्याचे रेकॉर्ड केल्याचे मुख्य संपादक डॉ. बिश्वस्वरूप रॉय चौधरीं यांनी जाहीर करीत याबाबतचे रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र आणि मेडल पाठविले आहे. यामुळे सांगलीचे नाव पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱयात पोहोचले आहे.

सामाजिक उद्देशाने कोणताही स्वार्थ न बाळगता होणारे अपघात कमी व्हावेत, यासाठी दीपक चव्हाण यांनी सुरू केलेली स्पीडब्रेकर रंगविण्याची मोहीम आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. या उपक्रमासाठी पत्नी प्रेरणा, आई शालन, बंधू सतीश व गणेश चव्हाण आणि मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य मिळाले.

मनपाचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्ती

n दीपक चव्हाण यांनी सामाजिक कामाचा ठसा सर्वदूर पसरविला आहे. त्यांनी 1 मे 2018 पासून स्वच्छता मोहीम सुरू ठेवली आहे. पर्यावरणपूरक काम केले आहे. नदी स्वच्छता आणि एड्स निर्मूलन यासाठीही त्यांनी काम केले आहे. महापुरात आणि कोरोना काळातही 555 दिवस जनजागृती केली आहे, याची दखल घेत त्यांची तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्या ब्रँड ऍम्बेसेडरपदी नियुक्ती केली, तर ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत त्यांनी 75 ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम पूर्ण केले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;