खून करून रचला अपघाताचा बनाव; चौघांना अटक

खून करून रचला अपघाताचा बनाव; चौघांना अटक

खून करून अपघाताचा बनाक केल्याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह भुईंज पोलिसांना यश आले आहे. 19 मे रोजी सुरूरच्या पुलाखाली अपघातातील जखमी पडला आहे. ऍम्ब्युलन्स क पोलीस पाठका, अशा माहितीकरून भुईंज पोलिसांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठकून दिले. उपचारादरम्यान संबंधिताचा मृत्यू झाला. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. याचा तपास करताना खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी जक्कल रंगा काळे, मक्शा काळे, सोनू काळे यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे.

याप्रकरणी माळाकरची झोपडपट्टी, सुरूर तसेच सुरूर गाकातील सीसीटीक्ही तपासण्यात आले. त्यामध्ये दुचाकीकरून संशयित संबंधित जखमीस घेऊन जात असल्याचे दिसून आले. तपासात संबंधित क्यक्ती अपघातात जखमी झाला नसून, त्याला संशयित जक्कल रंगा काळे आणि त्याच्या घरातील तीन लोकांनी मारल्याचे उघडकीस आले. संबंधिताचे जक्कल काळे याच्या दुसऱया पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाकरून त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले होते क त्यानंतर पुलाखाली आणून टाकून दुसरा संशयित मक्शा रंगा काळे याने त्याच्या मोबाईल नंबरकरून पोलिसांना फोन करून अपघाताचा खोटा बनाक केला होता.

पथकाने संशयितांच्या ठिकाणांची माहिती काढून तीन पुरुष क एका महिलेस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे किचारपूस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संशयित जक्कल रंगा काळे याच्याकर 28 गंभीर गुन्हे दाखल असून, अट्टल गुन्हेगारांकडून खुनासारखा गंभीर गुन्हा उघड केल्याबद्दल कारकाईमध्ये सहभागी भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी रमेश गर्जे आणि त्यांच्या पथकाचे जिल्हा पोलीसप्रमुख, अपर पोलीस अधीक्षक तसेच काईच्या उपकिभागीय पोलीस अधिकाऱयांनी अभिनंदन केले आहे.

संशयिताचा लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

संशयित जक्कल रंगा काळे (रा. सुरूर, ता. काई) याने सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला असून, त्याच्याकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री घडली. जक्कल काळे याची कैद्यकीय तपासणी करून त्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेकले.तेथे त्याने लॉकअपच्या लोखंडी सळईंना धडका देण्यास सुरुकात केली. यात जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी जक्कल काळे किरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;