शेअर बाजार गडगडला…! सेन्सेक्स 667 अंकांनी तर निफ्टी 183 अंकांनी घसरला

शेअर बाजार गडगडला…! सेन्सेक्स 667 अंकांनी तर निफ्टी 183 अंकांनी घसरला

शेअर बाजारात आज सलग तिसऱया दिवशी घसरण पाहायला मिळाली. हिंदुस्थानी शेअर बाजारात पुन्हा एकदा नफेखोरी करण्यात आल्याने शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये अक्षरशः स्वाहा झाले. ट्रेडिंगच्या अखेर सेन्सेक्स 667.55 अंकांनी घसरून 74,502 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 183 अंकांनी घसरून 22,704 अंकांवर बंद झाले. बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअरमध्ये सर्वात जास्त घसरण महिंद्रामध्ये दिसली. या शेअरमध्ये दोन टक्क्यांहून जास्त घसरण झाली.

चार लाख कोटी स्वाहा

परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची बाजारपेठ हिंदुस्थानी शेअर बाजार आहे, परंतु आता हिंदुस्थानी बाजाराचा भ्रमनिरास होत आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार आशियाई बाजारांतून सर्वाधिक पैसा हिंदुस्थानातून काढून घेत आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पैसे काढण्याची चढाओढ

परकीय गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानातून सर्वाधिक पैसा काढला. इंडोनेशिया 700 दशलक्ष डॉलर, व्हिएतनाम 415 दशलक्ष डॉलर, थायलंड 210 दशलक्ष डॉलर आणि फिलिपिन्स बाजारातून 58 दशलक्ष डॉलर्स काढण्यात आले. याउलट जपानमध्ये 63 हजार कोटी, तैवानमध्ये 52 हजार कोटी आणि दक्षिण कोरियामध्ये 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;