नगर अर्बन बँक घोटाळाप्रकरण – पुण्यातील कर्जदाराला केली अटक

नगर अर्बन बँक घोटाळाप्रकरण – पुण्यातील कर्जदाराला केली अटक

 

नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली आहे. अक्षय राजेंद्र लुणावत (वय 34, रा. उंड्री, पुणे) असे या कर्जदाराचे नाव आहे. उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून लुणावत याला ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाने त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून, त्याच्या नावावर 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्याने बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्याशी संगनमत करुन कल्पद्रुमा ज्वेल्स ऍण्ड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मुल्यांकन दर्शवून वेळोवेळी मोठय़ा रकमांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेचा गैरवापर करून व कर्ज रकमेची परतफेड केली नाही. या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे. लुणावत याने सन 2015 मध्ये घेतलेल्या 6 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नगर अर्बन बँकेचे कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नोलॉजी या फर्मच्या नावाने मंजूर कर्जाची रक्कम वापरण्यात आली आहे. टेरासॉफ्ट टेक्नोलॉजीच्या खात्यातून 3 कोटी 5 लाख रुपये माउली ट्रेडर्स यांच्या मर्चंट्स बँकेतील खात्यात वर्ग केली व तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगर अर्बन बँकेत जमा करून त्याद्वारे त्याचे कर्ज निरंक केल्याचे दर्शवलेले आहे. लुणावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरीया, डॉ. नीलेश शेळके यांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत. या रकमा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने अक्षय लुणावत यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने लुणावत याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;