रेल्वेच्या एसीपींची सलग दुसऱया दिवशी चौकशी

रेल्वेच्या एसीपींची सलग दुसऱया दिवशी चौकशी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी सलग दुसऱया दिवशी रेल्वेचे सहाय्यक आयुक्त शहाजी निकम यांची चौकशी केली गेली. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी आतापर्यंत 16 तास निकम याची चौकशी केली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी तपासासाठी गुन्हे शाखेने एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीने चौकशीसाठी रेल्वेचे सहायक आयुक्त शहाजी निकम यांना समन्स केले होते. मंगळवारी काही तास चौकशी केली. त्यानंतर आज निकम हे चौकशीसाठी हजर झाले.  दुर्घटनाग्रस्त होर्डिंगच्या माध्यमातून मिळणारे पैसे हे रेल्वे पोलिसांच्या खात्यात जमा होत होते. पहिल्या तीन होर्डिंगच्या तुलनेत दुर्घटनाग्रस्त होर्डिंगमधून रेल्वे पोलिसांना जास्त पैसे मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. एका तत्कालीन आयुक्तांच्या सांगण्यावरून होर्डिंगला परवानगी दिली होती.

भिंडेच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ

घाटकोपर हार्ंडग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाली. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 30 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपासात आणखी पुरावे हाती लागले असून त्यादृष्टीने चौकशी करण्यासाठी भिंडेच्या कोठडीत वाढ देण्याची विनंती पोलिसांनी केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;