रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱयाला 5 वर्षे शिक्षा
लोकल ट्रेनमधून उतरणाऱया प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱया चोरटय़ाला सत्र न्यायालयाने 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राहुल केवट असे चोरटय़ाचे नाव असून तो 21 फेब्रुवारी 2019 पासून तुरुंगात आहे.
लोकल प्रवासात सांताक्रुझ-पूर्वेकडील मंजूर शेखचा 20 हजार रुपयांचा मोबाईल चोरला. याप्रकरणी राहुलला अटक केली होती. त्याला अटकेपासूनच्या कोठडीतील कालावधी वगळून उर्वरित तुरुंगवास भोगावा लागणार आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल चोरीची घटना घडली होती. राहुलने मंजूरचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्याचा पाठलाग करताना मंजूर पडला होता व त्याला दुखापत झाली होती. अखेर पोलिसांनी राहुलला पकडले होते. राहुल विनातिकीट लोकलमध्ये शिरल्याचेही पुराव्यांवरून सिद्ध झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List