कचरा रोखण्यासाठी बंदिस्त नाले, मजबूत जाळय़ा बसवणार
पालिकेच्या माध्यमातून वस्तीमधील नाल्यांची सफाई केली तरी अवघ्या दोन दिवसांतच नाले कचऱयाने तुडुंब भरत असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. नाल्यांमध्ये टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी नाले बंदिस्त करणे, जाळय़ा बसवणे अशा प्रकारे ‘स्क्रिनिंग’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली.
मुंबईतील अनेक अनेक भागातील नाले स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. हे रोखण्यासाठी सुमारे तीन ते चार मीटर रुंदीच्या नाल्यांमध्ये स्क्रीन टाकून कचरा रोखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. जी स्क्रीन एक फूट खाली बुडालेली असेल. टप्प्याटप्प्यावर अशी व्यवस्था केल्यास जाळय़ांमध्ये अडकलेला कचरा काढता येईल.
या ठिकाणी प्रयोग यशस्वी
नदी-नाल्यांमध्ये वाहून येणारा तरंगता कचरा थेट समुद्रात जाऊ नये यासाठी पालिका तरंगता कचरा ‘ट्रश बुम’ या टेक्नॉलॉजीने अडवून बाहेर काढला जात आहे. जुहूतील गझधरबंध नाला तसेच मेन अव्हेन्यू नाला, अंधेरीतील मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोयसर नदी, दहिसर नदी, वाकोला नदी, मिठी नदी अशा आठ ठिकाणी ही ट्रशबूम प्रणाली बसवली आहे. तर नवव्या ठिकाणी म्हणजे मिठी नदीवर माहीम निसर्ग उद्यानाजवळ ही प्रणाली बसवण्याचे नियोजन आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List