पोलीस ऍकॅडमीतील द्वारका डोके यांची एव्हरेस्टवर चढाई; शिखरावर फडकावला तिरंगा, महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज

पोलीस ऍकॅडमीतील द्वारका डोके यांची एव्हरेस्टवर चढाई; शिखरावर फडकावला तिरंगा, महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज

जणू त्यांना हिम शिखरेच साद घालत होती, त्यामुळेच जिद्दीने या स्वप्नपूर्तीसाठी तयारी केली आणि वयाच्या 49व्या वर्षी 22 मे रोजी एव्हरेस्टचे शिखर गाठले. राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकावला. त्यावेळी हातात होता दिवंगत आई-वडिलांचा पह्टो. ही गौरवास्पद कामगिरी केली नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमीतील सहाय्यक संचालिका द्वारका डोके यांनी. एव्हरेस्ट सर करणाऱया त्या महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव महिला ठरल्या आहेत.

नगर जिह्यातील राहुरी तालुक्यातील केसापूरच्या मूळ रहिवासी असलेल्या द्वारका विश्वनाथ डोके या श्रीरामपूर येथे वास्तव्यास आहेत. सन 2006 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्या महाराष्ट्र पोलीस दलात रूजू झाल्या. सध्या नाशिकच्या पोलीस अॅकॅडमीत पोलीस निरीक्षक अर्थात सहाय्यक संचालिका म्हणून कार्यरत आहेत.  दरम्यान, श्रीरामपूरकरांनी स्वागत करून मिरवणूक काढल्याने आनंद द्विगुणित झाला.

असा झाला प्रवास

द्वारका डोके 24 मार्च रोजी काठमांडूत दाखल झाल्या. लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पासंग शेरपा यांच्यासोबत बेस पॅम्पवर चढण्यास 17 मे रोजी सुरुवात केली. खडतर अशी ही चढाई करून 22 तारखेला पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी शिखर गाठले. तेथे राष्ट्रध्वज व महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज फडकावला. राष्ट्रगीताचे गायन केले. आई-वडिलांचा पह्टो हातात घेवून श्रद्धांजली वाहिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;