दादर रेल्वे स्थानकामध्ये डेंग्यू, मलेरियाचा दबा
पावसाळा तोंडावर आला असताना पालिकेच्या तपासणीत दादर रेल्वे स्थानक परिसरात डेंग्यू, मलेरिया आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून फवारणी करून ही डेंग्यू, मलेरियाची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. शिवाय स्टेशन परिसरात फवारणी केली आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका असल्यामुळे पालिकेने व्यापक प्रमाणात डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये मलेरियाला कारणीभूत ठरणारा एडीस आणि डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱया अॅनोफिलीस डासांची स्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत. पालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागाने डासांच्या अळय़ांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत दादर, माहीम, माटुंगा व शीव स्थानकातील शेडवर मलेरिया, डेंग्यूचा फैलाव होण्यास कारणीभूत डासांच्या अळय़ांची उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला जात असून पालिकेकडून संबंधित ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List