कश्मीर सीमेवरही चीनचे पाकिस्तानला लष्करी पाठबळ
चीन गेल्या तीन वर्षांपासून जम्मू-कश्मीरमधील नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानी सैन्याच्या संरक्षण क्षमतांना भरभक्कम पाठबळ देतो आहे. पक्क्या अभेद्य बंकरची उभारणी आणि मानवरहित हवाई आणि लढाऊ हवाई वाहनांची तरतूद येथे चीनने केली आहे. संदेशवहनाचे मनोरे आणि भूगर्भातील फायबर केबलचे जाळे, चीनी बनावटीच्या रडार यंत्रणा, ट्रकवर बसवलेल्या चीनी हॉवित्झर तोफाही चीनने पाकिस्तानला उपलब्ध करून दिले आहेत. पाकव्याप्त कश्मीरमधील चिनी गुंतवणुकीचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीनने येथे भूमीगत बंकरसह पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, असे अधिकाऩयांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List