दहिसरमध्ये पावसाळापूर्व कामांचा बोजवारा; शिवसेनेचा प्रचंड मोर्चा
पालिकेच्या आर/उत्तर दहिसर पूर्व आणि पश्चिम भागात पावसाळा तोंडावर आला असताना अनेक नाले तुंबलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे प्रचंड वाहतूककाsंडी होत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास पावसाळय़ात जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग क्र. 1 च्या वतीने उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आर/उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले.
दहिसर विभागात पावसाळापूर्व कामांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे विनोद घोसाळकर यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, नालेसफाईची व रस्ते दुरुस्तीची सर्व पंत्राटे मुंबई महापालिकेने माजी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कारकीर्दीत दिलेली आहेत. चहल यांनी जी-20 परिषदेच्या वेळेस झाडांभोवती विद्युत रोषणाई, रंगीत पुंडय़ा, रंगरंगोटीच्या नावाखाली मुंबई महानगरपालिकेच्या निधीची उधळपट्टी केली. त्याच चहल यांच्या कार्यकाळात नालेसफाई व रस्तेदुरुस्तीच्या कामातदेखील मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. अजूनही पंत्राटदार ठिकठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरूच ठेवत आहे. यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या प्रकारे चहल यांनी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे त्याची ‘एसआयटी’कडून चौकशी करण्यात यावी. यावेळी शिवसेना आमदार विलास पोतनीस, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष भूषण पाटील, आपचे संदीप मेहता व गोपाळ झवेरी, राष्ट्रवादीचे मनीष दुबे, विभागप्रमुख उदेश पाटेकर, भास्कर खुरसुंगे, हर्षद कारकर, योगेश भोईर, संजय सिंघल, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, संध्या दोशी, माधुरी भोईर, वीणा सिंघल, शशिकांत झोरे, हरेश पांडय़ा उपस्थित होते.
घरात पाणी शिरले तर पालिका जबाबदार
मुंबईकर पालिकेला आठ प्रकारचे कर भरतात. तरीदेखील नागरी सुविधा मिळत नसतील, घरांत, सोसायटयांमध्ये पाणी शिरत असेल तर पालिका जबाबदार असून पालिकेने रहिवाशांना नुकसानभरपाई द्यावी, नागरिकांना असेसमेंट बिलामध्ये सवलत दिली पाहिजे, असे घोसाळकर म्हणाले. गणपत पाटील नगरातील रस्ते आणि गटारे यासाठी दहा कोटी मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांची नालेसफाई पाहणी म्हणजे केवळ दिखावा असल्याचे सांगताना मिंध्यांच्या इशाऱयावर काम करणाऱया अकार्यक्षम आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List