100 दिवसांचे मानधन केवळ 150 रुपये! बीएलओंची निवडणूक आयोगाकडून थट्टा

100 दिवसांचे मानधन केवळ 150 रुपये! बीएलओंची निवडणूक आयोगाकडून थट्टा

रणरणत्या उन्हाची पर्वा न करता लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची यादी तयार करण्यापासून ते मतदान कार्ड घरोघरी पोहोचवण्यापर्यंतची सर्व कामे बीएलओ डय़ुटी बजावणाऱया शिक्षकांनी उत्साहाने केली. असे असतानाही बीएलओंना शंभर दिवसांच्या कामासाठी निवडणूक आयोगाने अवघे 150 रुपये मानधन देऊन त्यांची थट्टा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

शिक्षकांकडे शाळेतील कामाचा बोजा असतानादेखील त्यांना निवडणुकीच्या कामांसाठी जुंपले जाते. यंदाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना फेब्रुवारीपासून निवडणुकांची कामे लावण्यात आली. शिक्षकांनी तीन महिने बीएलओ डय़ुटी प्रामाणिकपणे बजावूनही आयोगाने तुटपुंज्या मानधनावर त्यांची बोळवण केली. याबाबत चेंबूरमध्ये बीएलओ डय़ुटी बजावणाऱया शिक्षिका म्हणाल्या, रणरणत्या उन्हाची पर्वा न करता घरोघरी जाऊन मृत, दिव्यांग आणि स्थलांतरित व्यक्ती शोधून त्याचे अहवाल देणे, नवीन मतदार नोंदणी करणे, वयोवृद्धांसाठी गृह मतदान प्रक्रिया राबविणे अशी निवडणूक आयोगाचे अधिकारी सांगतील ती कामे केली. मार्चनंतर शिक्षकांना फक्त मंगळवार आणि शनिवार बोलवायचे असा निर्णय झाला तरी आम्हाला दररोज बोलावले जायचे.  केवळ एक दिवस काम करणाऱया निवडणूक अधिकाऱयांना 1300 ते 2000 इतके मानधन दिले जाते, मग बीएलओंना तीन महिन्यांसाठी 150 रुपये कसे काय? केलेल्या कामाचे आणि मानधनाचे गुणोत्तर कशाच्या आधारावर ठरवले, असा सवाल या शिक्षिकेने उपस्थित केला.

सोयीसुविधांची वानवा

निवडणुकीच्या दिवशी दिवसभर आम्ही सर्व बीएलओ मतदान पेंद्राबाहेर उन्हात बसलो होतो. तिथे साधा पंखासुद्धा नव्हता. निवडणूक झाल्यावर शिल्लक राहिलेल्या स्लीप आणि अहवाल घेऊन पुन्हा मुख्य निवडणूक कार्यालय इथे बोलावले. एकदाही आम्हाला वाहन सुविधा दिली नाही, असेही या शिक्षिकेने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;