मध्य रेल्वेवर जम्बोब्लॉक; 72 एक्प्रेस आणि 956 लोकल फेऱया रद्द

मध्य रेल्वेवर जम्बोब्लॉक; 72 एक्प्रेस आणि  956 लोकल फेऱया रद्द

मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रविवार, 2 जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटीत 36 तासांचा आणि ठाण्यात 63 तास ब्लॉक आहे. ब्लॉक कालावधीत एकूण 956 लोकल फेऱया तसेच 72 मेल-एक्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे विकेण्डला फिरण्यासाठी बाहेर पडणाऱयांचे हाल होणार आहेत.

सीएसएमटी स्थानकातील 10 व 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी व ठाणे स्थानकावरील 5 व 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू होणारा हा मेगाब्लॉक 2 जून दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवार, 31 मे रोजी लांब पल्ल्याच्या 4 गाडय़ा व 187 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. शनिवारी लांब पल्ल्याच्या 37 गाडय़ा व 534 लोकल तसेच रविवारी लांब पल्ल्याच्या 31 गाडय़ा व 235 लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम द्या 

मध्य रेल्वेने सर्व सरकारी व खासगी कंपन्यांना ब्लॉकच्या काळात त्यांच्या कर्मचाऱयांना रजा किंवा वर्क फ्रॉम होम देण्याचे तसेच प्रवाशांनादेखील अतिशय गरजेच्या कारणाव्यतिरिक्त या मार्गावरून प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;