हायकोर्टात मिळाला न्याय; व्याकुळ आई बाळाला कुशीत घेऊन सुखावली

हायकोर्टात मिळाला न्याय; व्याकुळ आई बाळाला कुशीत घेऊन सुखावली

 बाळाच्या ओढीने झोप उडालेल्या आईला हायकोर्टाचे दार ठोठावल्यानंतर अखेर न्याय मिळाला. तिचे बाळ परत करण्याचे आदेश बाल कल्याण समितीने जारी केले. 29 मार्चला बाळाचा जन्म झाला. अवघ्या सात दिवसांत आईने बाळाला निवारागृहाकडे सोपवले. 29 मे रोजी बाळ आईला परत मिळाले. व्याकुळ झालेली आई बाळाला कुशीत घेऊन सुखावली.

दत्तक प्रक्रियेसाठी दिलेले बाळ परत मिळवण्यासाठी आईने अॅड. वर्षा भोगले यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्याची गंभीर दखल न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने घेतली. समितीला याबाबत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार समितीने बाळ परत करण्याचे आदेश जारी केले. त्याची माहिती बुधवारी समितीने न्यायालयात दिली. बाळ आईला दिले आहे. वर्षभर बाळाच्या संगोपनावर लक्ष ठेवले जाईल, असे समितीने खंडपीठाला सांगितले.

काळजीने जीव कासावीस

बाळ रात्री जागे असते, दिवसा झोपते हे आईला ज्ञात होते. बाळ दुधासाठी रडत तर नसेल ना, त्याची काळजी घेतली जात असेल ना, या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. दूध बंद होण्यासाठी तिने औषध घेतले होते. दूध बंद होत नव्हते. बाळाच्या काळजीने तिचा जीव कासावीस झाला होता. अखेर तिने बाळाला परत घेण्याचे ठरवले. त्यासाठी तिने आशा सदन व समितीला विनवणी केली. दत्तक प्रक्रिया रद्द करण्यासाठी 29 एप्रिल 2024 रोजी रीतसर अर्ज केला. अर्जाचे उत्तर मिळत नसल्याने तिने न्यायालयात धाव घेतली.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;