गीरमध्येही पर्यटकांची असंवेदनशीलता; सिंहाला घेरले

गीरमध्येही पर्यटकांची असंवेदनशीलता; सिंहाला घेरले

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाप्रमाणेच सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीर राष्ट्रीय उद्यानाच्या व्यवस्थापनानेही डोळय़ावर पट्टी बांधल्याचे उघड झाले आहे. मोदींच्या गुजरातमधील गीर अभयारण्यात आशियाई सिंह पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे सिंहांना पर्यटकांपासून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मोबाईल कॅमेऱयात सिंहांचे चित्रीकरण करण्यास, व्हिडीओ काढण्यास मनाई आहे. जिप्सीचा स्पीडही ताशी 20 किलोमीटरहून अधिक असता कामा नये; परंतु गीर राष्ट्रीय उद्यानात नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून सिंहाला जिप्सीमधून फिरणाऱया पर्यटकांनी घेरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे वन्यप्रेमींनी गीरच्या राष्ट्रीय उद्यानातील सिंहांच्या सुरक्षेवरून तीव्र चिंता व्यक्त केली असून सिंह आक्रमक झाला तर अनेकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

काय आहेत गीरच्या जंगलातील नियम?

z गीरच्या राष्ट्रीय उद्यानातील सिंहांच्या जीवनशैलीत पर्यटक बाधा आणू नयेत यासाठी आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच 2016 मध्येच कडक नियम बनवण्यात आले.

z गाईड, ट्रकर्स आणि सफारी चालक यांच्यासह केवळ आठ पर्यटकांनाच एकावेळी परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कुणालाही मोबाईल पह्न घेऊन जाण्याची परवानगी नाही.

z दिवसाला केवळ 90 पर्यटकांनाच जंगलात सोडण्याची परवानगी असून जिप्सीचा वेगही ताशी 20 किलोमीटर इतकाच असायला हवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;