बाय बाय भाजप, गुडबाय मोदी! राहुल गांधी यांची घोषणा देशभरात गाजतेय

बाय बाय भाजप, गुडबाय मोदी! राहुल गांधी यांची घोषणा देशभरात गाजतेय

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार टिपेला पोहचला असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तोफ सर्वत्र धडाडत आहे. राहुल यांनी उत्तर प्रदेशातील बांसगाव येथील जाहीर सभेतून ‘बाय बाय भाजप, गुडबाय मोदी’, असा नारा देत 4 जूनला देशात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राहुल यांचा हा नारा देशभरात चांगलाच गाजत आहे. राहुल यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीची लाट पाहायला मिळत आहे. सपा आणि काँग्रेसच्या सभांना अलोट गर्दी उसळत आहे. बांसगाव येथे राहुल आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त सभा झाली. या सभेत राहुल यांनी मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. इंडिया आघाडीचा मोठा विजय होणार आहे. त्यामुळे 4 जूननंतर देश भाजपपासून मुक्त होणार आहे. देशात अच्छे दिन येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करतानाच ‘अलविदा भाजप, अलविदा नरेंद्र मोदी’, अशी घोषणाही राहुल यांनी दिली.

अग्निवीरयोजनेने जवानांना मजूर बनवले   

पंतप्रधान मोदी यांनी देशाची सेवा करणाऱया जवानांना मजूर बनवले आहे. देशाच्या इतिहासात याआधी असे कधीच घडले नव्हते. हिंदुस्थानी लष्कर, देशभक्त जनता आणि जवान या सर्वांचाच ‘अग्निवीर’ योजनेमुळे अपमान झाला आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्वात आधी आम्ही ही योजना बंद करणार आहोत, असे राहुल म्हणाले.संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान दिला. स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. हा अधिकार भाजपला हिरावून घ्यायचा आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही.

मोदींनी अब्जाधीशांच्या खिशात पैसे टाकले. त्यांनी विदेशात जमिनी आणि बंगले खरेदी केले. आम्ही गरिबांचा खिसा पैशांनी भरणार आहोत. हा पैसा देशातच खर्च होईल. त्यामुळे बंद पडलेले कारखाने सुरू होतील. रोजगार मिळतील.

 

विजयाची लाइन लागणार…  टकाटक टकाटक टकाटक

समाजवादी पक्षाची सायकल आणि काँग्रेसचा हात एकत्र आले आहेत. सायकलला हाताच्या पंजाने भक्कमपणे पकडले आहे. आता आपला विजय निश्चित आहे. लिहून घ्या, उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी क्लीन स्वीप करणार आहे. जागांची लाइन लागणार आहे. टकाटक टकाटक टकाटक… अशा जागा आपण जिंकणार आहोत. त्यानंतर गुड बाय भाजप, गुड बाय नरेंद्र मोदी… टाटा, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;