मुंबईतील 20 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक; पावसाळापूर्व सर्वेक्षण करून म्हाडाने जाहीर केलीयादी
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी 20 इमारती अतिधोकादायक आढळल्या असून यामध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या चार इमारतींचादेखील समावेश आहे. गेल्या वर्षी 22 इमारती अतिधोकादायक होत्या. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू आणि रहिवाशांनी मंडळाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून इमारती रिक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.
जाहीर केलेल्या 20 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये 711 रहिवासी आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे केलेल्या कार्यवाहीनुसार 36 रहिवाशांनी स्वतःची निवाऱयाची पर्यायी व्यवस्था केली आहे, तर आतापर्यंत 46 रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे. उर्वरित इमारतींमधील रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना दिल्या असून घर खाली करण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच 412 रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे.
म्हाडाचा नियंत्रण कक्ष
मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास कळवावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे. संपर्क ः रजनी महल, पहिला मजला, 89-95, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-400034. 23536945, 23517423, 9321637699
या आहेत अतिधोकादायक इमारती
इमारत क्रमांक 4-4 ए, नवरोजी हिल रोड क्र. 1, जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील) z इमारत क्रमांक 57 निझाम स्ट्रीट z इमारत क्रमांक 67, मस्जिद स्ट्रीट z इमारत क्रमांक 52-58, बाबु गेणु रोड z इमारत क्रमांक 7 खंडेराव वाडी/ 204-208, काळबादेवी रोड z इमारत क्रमांक 52 -52 अ, 2 री डेक्कन क्रॉस रोड z इमारत क्रमांक 125-127ए, जमना निवास, खाडिलकर रोड, गिरगाव z इमारत क्रमांक 314 बी, ब्रह्मांड को ऑप हौ. सोसायटी, व्ही. पी. रोड, गिरगाव z इमारत क्रमांक 418-426 एस. व्ही. पी रोड, (124 ते 134 ए ) गोलेचा हाऊस z इमारत क्रमांक 83-87 रावते इमारत, जे. एस. एस. रोड, गिरगाव z इमारत क्रमांक 213-215 डॉ. डी. बी. मार्ग z इमारत क्रमांक 38-40 स्लेटर रोड z 9 डी चुनाम लेन z 44 इ नौशीर भरुचा मार्ग z 1 खेतवाडी 12 वी लेन z 31 सी व 33 ए, आर. रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग, गिरगाव चौपाटी (मागील वर्षीच्या यादीतील) z इमारत क्रमांक 104-106, मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील) z इमारत क्रमांक 55-59-61-63-65 सोफिया झुबेर मार्ग z इमारत क्र. 44-48, 33-37 व 9-12 कामाठीपुरा 11 वी व 12 वी गल्ली, देवल बिल्डिंग z अंतिम भूखंड क्र. 721 व 724 टीपीएस – 3 विभाग, इमारत क्रमांक 40 बी व 428, उपकर क्र ग उत्तर 50-95 (1) आणि ग उत्तर -5103 आत्माराम बिल्डिंग व पेणकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)
थकाने सदर ठिकाणी सापळा रचून ते दोघे येताच त्यांच्यावर झडप घातली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List