उलटा चोर कोतवाल को डाटे… इंटरेस्टिंग! अब आयेगा मजा!! संजय राऊत यांचा मिंधेंना जबरदस्त टोला

उलटा चोर कोतवाल को डाटे…  इंटरेस्टिंग! अब आयेगा मजा!! संजय राऊत यांचा मिंधेंना जबरदस्त टोला

लोकसभा निवडणुकीतील मिंधेंच्या ‘खोकेबहाद्दर’ प्रचाराची केलेली पोलखोल झोंबताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यावर ‘50 खोके एकदम ओके! इसे कहते है, उलटा चोर कोतवाल को डाटे… व्हेरी इंटरेस्टिंग… अब आयेगा मजा,’ अशी पोस्ट एक्सवर करीत संजय राऊत यांनी आज मिंधेंना जबरदस्त टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात अमर्याद पैसा खर्च केला. प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपयांचे वाटप केले. अजित पवार यांचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिंदे यांनी हे केले, असा दावा करणारा लेख नुकताच प्रसिद्ध झाला. त्यामुळे हादरलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या वकिलांमार्फत संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यावर संजय राऊत यांनी आज एक्स माध्यमातून मिंधेंना चांगलेच फैलावर घेतले. ‘50 खोके एकदम ओके! इसे कहते है, उलटा चोर कोतवाल को डाटे! घटनाबाह्य मुख्यमंत्री श्रीमान शिंदे यांनी आम्हाला एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अतिशय मनोरंजक आणि एक मजेशीर राजकीय पत्र… अब आयेगा मजा!!’, अशी जबरदस्त पोस्ट संजय राऊत यांनी  केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या नोटिसीची प्रतही त्यांनी एक्सवर शेअर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;