कुटुंबातील 8 जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास
पत्नी, आई, बहीण, भाऊ-वहिनी, दोन भाच्या, पुतण्या यांची मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास कुऱहाडीचे घाव घालून हत्या केल्यानंतर येथील दिनेश या युवकाने गळफास लावून घेतला. घरातील सर्वांची हत्या केल्यावर त्याने शेजारीच असलेल्या काकाच्या घरी जाऊन पुतण्यावर हल्ला केला होता. तिथून पळून गेल्यावर त्याने थोडय़ाच अंतरावर एका झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. तामिया तालुक्यातील माहुलझीर पोलीस ठाण्याच्या बोदल कचर गावात मंगळवारी रात्री अडीच वाजता या तरुणाने हे रक्तरंजित थैमान घातले. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या या तरुणाचे 21 मे रोजीच लग्न झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List