पुण्यापाठोपाठ फडणवीसांच्या नागपूरमध्येही हिट ऍण्ड रन; मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन महिलांना भरधाव कारने उडवले

पुण्यापाठोपाठ फडणवीसांच्या नागपूरमध्येही हिट ऍण्ड रन; मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन महिलांना भरधाव कारने उडवले

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरील तरुण आणि तरुणीला उडवल्याची घटना ताजी असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्येही हिट ऍण्ड रनची घटना घडल्याचे उघड झाले आहे. नागपूरच्या शारदा चौकाजवळ दोन महिला चालत होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या पांढऱया रंगाच्या भरधाव कारने दोघींना जोराची धडक दिली. एक महिला दूर फेकली गेली. कहर म्हणजे त्याच महिलेला त्याच कारने पुन्हा चिरडले. या महिलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 7 मे रोजी घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे.

घटनेला 15 हून अधिक दिवस उलटूनही पोलीस आरोपीला पकडू शकले नाहीत त्याबद्दल जखमी महिलांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांना यासंदर्भात विचारले असता अद्याप तपास सुरू असल्याचे सांगितले जाते. तसेच गाडीचा नंबर स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जर नंबर नोट केला असेल तर तो नंबर आम्हाला द्या. आम्ही छडा लावतो, असे उलट उत्तर देण्यात येत असल्याचे जखमी महिलांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;