गोवंडीत झाडांच्या मुळावर उठले काँक्रिटीकरण, तातडीने काँक्रिटीकरण काढून टाकण्याचे पालिकेला आदेश

गोवंडीत झाडांच्या मुळावर उठले काँक्रिटीकरण, तातडीने काँक्रिटीकरण काढून टाकण्याचे पालिकेला आदेश

गोवंडी-शिवाजीनगर परिसरातील झाडांभोवती बेकायदेशीरपणे काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे झाडे मरण्याच्या मार्गावर आहेत. याकडे लक्ष वेधणाऱया रिट याचिकेची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. तसेच पालिका व वृक्ष प्राधिकरणाला झाडांची तातडीने तपासणी करून मुळांभोवती असलेले काँक्रिटीकरण हटवण्याचे आदेश दिले.

गोवंडी येथील इरफान अहमद खान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. देवनार गावातील 11 झाडांच्या मुळाभोवती बेकायदा काँक्रिटीकरण केले आहे. तसेच इतर 27 झाडांभोवती इमारत बांधकाम साहित्याचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित झाडे मरण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत जबाबदार लोकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र पालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी कारवाईची ठोस पावले उचलली नाहीत. झाडांच्या अस्तित्वावर उठलेले बेकायदा काँक्रिटीकरण ‘जैसे थे’ आहे, असा दावा याचिकाकर्त्यातर्फे करण्यात आला. त्यावर पालिकेतर्फे ऍड. सागर पाटील यांनी बाजू मांडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;