काँग्रेस नेते किरण काळेंची बदनामी करणे पवनकुमार अग्रवालला भोवले, गुन्हा दाखल

काँग्रेस नेते किरण काळेंची बदनामी करणे पवनकुमार अग्रवालला भोवले, गुन्हा दाखल

काँग्रेस नेते, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे पवनकुमार अग्रवाल यांना चांगलेच भोवले आहे. अग्रवाल यांनी “मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून, धक्काबुक्की करुन , शिवीगाळ केल्या प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा” असे वक्तव्य पत्रकार परिषद केले होते. यावरून काळे यांनी उत्खाना पोलीस स्टेशन येथे अग्रवाल याच्या विरोधात भादवि 500 अन्वये सी आर पी सी च्या सेक्शन 155 अंतर्गत समाजात नाहक आपली बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत काळे यांनी म्हटले आहे की, गैर अर्जदार पवन कुमार अग्रवाल याने पत्रकार परिषद गंगाराम हिरानंदानी या इसमासह आयोजित केली. यावेळी समाज माध्यमांमध्ये “मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून, धक्काबुक्की, शिवीगाळ केली. या प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा. कारण त्यांच्या या वक्तव्यवरुन माझी समाजातील असणारी प्रतिष्ठा खराब करत नाहक बदनामी केली आहे. यावरून अग्रवाल याच्या विरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे म्हणाले की, किरण काळे यांनी कोणाच्याही मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने प्रवेश केलेला नसून कोणालाही धक्काबुक्की, शिवीगाळ केलेली नाही. तसा कोणताही गुन्हा त्यांच्या विरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाही. नगरकरांना माहित आहे की किरण काळे हे काही गुंड नाहीत. ते उच्चशिक्षित असून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असून शहरातील दहशत, गुन्हेगारी, ताबा गॅंग, अन्यायग्रस्तांना मदत करणे, शहरातील नागरी प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठविणे, शहर विकासासाठी काम करणे ही व्यापक जनहिताची कामे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने करत असून नगरकरांची सेवा करत आहेत. असे असतानाही अन्यायग्रस्तांना मदत करण्याची त्यांची भूमिका असल्यामुळे शहरातील काही तथागतीत कार्यसम्राट मंडळींचा पोटशूळ उठला आहे. त्यामुळे इतर लोकांना पुढे करून खोटी नाटी वक्तव्य करून किरण काळे यांची समाजात नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काँग्रेस योग्य वेळी अशा षडयंत्रांचा भांडाफोड करेल, असा इशारा उबाळे यांनी पक्षाच्या वतीने दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;