चंद्रपूर: दोन दिवसात एकाच गावात सात मृत्यू; उष्माघाताचा संशय
चंद्रपूर जिल्हात येणाऱ्या आवाळपूर गावात दोन दिवसात पाच जणांचा तर आज एकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत पावलेल्यांमध्ये आजाराचे लक्षणे नव्हती त्यामुळे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे सत्र सुरू असल्यानं गावात भीती पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावात ओआरएसचे वाटप करण्यात आले आहे. खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.
गेल्या 24 तासांत विदर्भातील विविध भागात उष्णतेची लाट जाणवत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 27 ते 29 मे दरम्यान विदर्भातील विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसाठी हवामान विभागाने बुधवार, गुरुवार साठी यलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवारपर्यंत सूर्यदेव उष्णतेपासून दिलासा देणार नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. जिल्हात सुरु असलेल्या सूर्यकोपाचे भीषण परिणाम पुढे आले आहेत.
‘या’ गावात मृत्यूसत्र…
कोरपना तालुक्यात येणाऱ्या आवाळपूर गावात दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महादेव वासेकर (70), अंबादास धोटे (72), चंद्रभान सोनटक्के (68), संजय मांदाळे, अहिम शेख (30), नानाजी राघोबा चहारे (90) अशी मृतकांची नावे आहेत. संजय मांदाळे हे मंगळवारला दुपारी शेतात गेले होते. शेतात ते मृत अवस्थेत आढळून आलेत.
तर मृत्यूचे कारण कळेल…
मृत्यू झालेल्या पैकी कुणीही रुग्णालयात गेले नव्हते. अचानक त्यांच्या मृत्यू झाला. मात्र संजय मांदाळे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल असे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदाफाटा येथील वैद्यकीय अधिकारी संकेत शेंडे यांनी सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List