दिल्लीत पारा पन्नाशी पार; 52.3 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद
बुधवारी दिल्लीत आतापर्यंतचं सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं आणि शहरातील मुंगेशपूर हवामान केंद्रावर पारा 52.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला, असं देशाच्या हवामान विभागाने (IMD) सांगितलं.
विक्रमी तापमानानंतर, दिल्लीत सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका-तीव्र पाऊस पडला, ज्यामुळे उकाड्यापासून सुटका झाली आणि वातावरणात गारवा आला.
या विक्रमी तापमानादरम्यान, शहराची वीज मागणी बुधवारी दुपारी 8,302 मेगावॅट (MW) वर आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली.
राजधानीच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेच्या मागणीने 8,300-MW चा टप्पा ओलांडला आहे. वीज वितरण कंपन्यांनी या उन्हाळ्यात विजेची मागणी 8,200 मेगावॅटवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता, असं डिस्कॉम अधिकाऱ्यांनी सांगितलं.
स्टेट लोड डिस्पॅच सेंटर, दिल्लीच्या मते, बुधवारी दुपारी शहराची सर्वाधिक वीज मागणी 8,302 मेगावॅट होती.
…तर 2000 रुपये दंड!
दिल्ली जल बोर्ड (DJB) ने देखील जाहीर केले आहे की ते पाणी वाया घालवताना आढळल्यास त्यांना 2,000 रुपये दंड आकारला जाईल. राष्ट्रीय राजधानीतील जलसंकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी मंगळवारी वायव्य दिल्ली मधील हवामान केंद्रात 49.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List