लातुरात अवैधरित्या बनावट गुटख्याचा कारखाना, 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

लातुरात अवैधरित्या बनावट गुटख्याचा कारखाना, 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

अतिरिक्त एमआयडीसी मध्ये असलेल्या एका गोदामात अवैधरित्या बनावट गुटख्याचा कारखाना चालवण्यात येत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. मंगळवारी पोलिसांनी धाड टाकून पोलिसांनी 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाला अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली. याची खात्री करून सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शना खालील पोलीस पथकाने दिनांक 28 मे रोजी लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी मधील कोंबडे अ‍ॅग्रो एजन्सी या वेअर हाऊसवर छापा टाकला. छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सिलिंग करणार्‍या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिकअप असा एकूण 03,05,73,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अंकुश रामकिशन कदम (32) रा. रामवाडी ता. चाकूर, हसनकुमार तिलाही उराम (21) रा. शाहबगंज (राज्य बिहार), गोकुळ धनराम मेघवाल रा. चुवा (राज्य राजस्थान), धनंजय गहिनीनाथ कोंबडे रा. लातूर, पारस बालचंद पोखरणा रा. लातूर, राम केंद्रे रा. लातूर व विजय केंद्रे रा. लातूर यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चालू आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, पोलीस नाईक अनंतवाड, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजाविली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;