‘ख्वाडा’ फेम भाऊसाहेब शिंदेची नवी झेप; दिसणार ‘या’ हिंदी चित्रपटात

‘ख्वाडा’ फेम भाऊसाहेब शिंदेची नवी झेप; दिसणार ‘या’ हिंदी चित्रपटात

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील ‘बाळू’ या पात्राने अभिनेता भाऊसाहेब शिंदे याला महाराष्ट्रभरात ओळख दिली. या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बबन’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिका भाऊसाहेब शिंदे याने गाजवली आता भाऊसाहेब शिंदे नव्या सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. ‘गोवर्धन’ हा भाऊसाहेब शिंदेचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

भाऊसाहेबच्या ‘रौंदळ’ चित्रपटामधलं अ‍ॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अ‍ॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या ‘गोवर्धन’ या आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

सिनेमाची गोष्ट काय आहे?

गोवर्धन’ या चित्रपटाचं नवं कोरं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर गोवर्धनच्या भूमिकेत भाऊसाहेब दिसणार असल्याचं लिहिलं आहे. पोस्टरवरील भाऊचा अँग्री यंग मॅनसारखा लूक लक्ष वेधून घेतो. भाऊसाहेबने नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘गोवर्धन’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. पोस्टर पाहिल्यावर याची खात्री पटते. या चित्रपटात भाऊसाहेबचे गायी-वासरांचं रक्षण करणाऱ्या ‘गोवर्धन’चं रूप पाहायला मिळणार आहे.

भाऊसाहेब शिंदे म्हणाला…

‘गोवर्धन’बाबत भाऊसाहेब शिंदे याने प्रतिक्रिया दिली. ‘गोवर्धन’ या चित्रपटात पुन्हा एकदा अॅक्शन रूपात दिसणार असलो. तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. तुमच्या आमच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात मोठ्या धाडसाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील भयाण वास्तव रुपेरी पडद्यावर सादर करत समाजाला आरसा दाखवण्याचं कामही हा चित्रपट करेल यात शंका नाही. हिंदू धर्मात गायीला माता मानली जाते. तिच्या ठायी तेहतीस कोटी देवांचं वास करत असल्याचं मानलं जातं. त्याच गोमातेच्या रक्षणार्थ उभ्या ठाकलेल्या नायकाची कथा ‘गोवर्धन’मध्ये आहे, असं भाऊसाहेब शिंदे म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;