अवघ्या 20 मिनिटांत दीपिका पादुकोणच्या पिवळ्या गाऊनचा लिलाव; मिळाली इतकी रक्कम
'फेक बेबी बंप' म्हणून नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिच्या ब्युटी ब्रँडशी संबंधित हा कार्यक्रम होता. यावेळी दीपिकाच्या पिवळ्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
पिवळ्या रंगाचा गाऊन, मेसी बन आणि सिंपल कानातले.. असा दीपिकाचा हा लूक होता. या मॅटर्निटी गाऊनमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या गाऊनचा नुकताच लिलाव करण्यात आला. या लिलावातून मिळालेली रक्कम ती दान करणार आहे.
दीपिकाने या पिवळ्या गाऊनचा लिलाव करणार असल्याचं जाहीर करताच अवघ्या वीस मिनिटांत हा गाऊन विकला गेला. त्याला 34 हजार रुपये इतकी किंमत मिळाली. ही रक्कम चांगल्या कारणासाठी दान करणार असल्याचं दीपिकाने सांगितलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List