घटस्फोटाचा सामना करत अभिनेत्रींनी सावरलं स्वतःचं आयुष्य, आज जगत आहेत रॉयल आयुष्य

घटस्फोटाचा सामना करत अभिनेत्रींनी सावरलं स्वतःचं आयुष्य, आज जगत आहेत रॉयल आयुष्य

बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रींनी अनेक संकटांचा सामना केला. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या – नताशा यांचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं आहे. तर आता अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी घटस्फोटाचं दुःख पचवल्यानंतर स्वतःचं आयुष्य सावरलं आहे.

अभिनेत्री रश्मी देसाई हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्री अनेक गोष्टींचा सामना केला आहे. नंदिश सिंग संधू याच्यासोबत रश्मीचं लग्न झालं होतं. पण अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. आता अभिनेत्री स्वतःच्या आयुष्यात पुढे गेली असून रॉयल आयुष्य जगत आहे.

अभिनेत्री चारू असोपा हिचं लग्न सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मुलीच्या जन्मानंतर दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. सध्या चारु ‘सिंगल मदर’ म्हणून मुलीचा सांभाळ करत आहे. शिवाय तिने पूर्ण लक्ष करियरकडे केंद्रीत केलं आहे.

अभिनेत्री जुही परमार हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. ‘कुमकुम – एक प्यारा सा बंधन’ मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री जुही परमार आजही चर्चेत असते. अभिनेत्री सचिन श्रॉफसोबत लग्न केलं होतं. पण दोघांचं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर जुही मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने दोनदा घटस्फोटचा सामना केला आहे. श्वेताचं पहिला घटस्फोट राजा चौधरी आणि दुसरं घटस्फोट अभिनव कोहली याच्यासोबत झाला. आता अभिनेत्र दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिनेत्री जेनिफर विंगेट हिचं लग्न अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्यासोबत झालं होतं. जेनिफर हिला घटस्फोट दिल्यानंतर करण याने अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं. पण जेनिफर हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. घटस्फोटानंतर अभिनेत्री रॉयल आयुष्य जगत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;