Pune Porsche Accident : अखेर दोन डॉक्टरसह वॉर्डबॉय निलंबित; वैद्यकीय शिक्षण विभागाची मोठी कारवाई
पुण्यात कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी विभागाने दोन डॉक्टरांसह एका वॉर्डबॉयला निलंबित केले आहे. या तिघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.
या प्रकरणात डॉक्टर आणि वॉर्डबॉयची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा वेंदात अग्रवाल याचे ब्लड सँपल बदलल्याचा आरोप या तिघांवर आहे. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल याच्यासह कोणी-कोणी फोन केले? किती रक्कम ठरली होती? त्यापैकी किती रक्कम मिळाली होती? याचा तपास पोलीस करत आहेत.
ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी तिघांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आोप झाला होता. यानंतर चौकशी समितीने तपास केला. त्यानंतर आज ही तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List