बृजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील कारची धडक, दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एका फॉर्च्युनर वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एक पादचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. ज्या फॉर्च्युनर कारमध्ये हा अपघात झाला त्यात कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील कारचा समावेश होता. गाडीवर पोलीस स्कॉर्ट लिहिलेले आहे.
ही भीषण दुर्घटना कर्नलगंज परिसरातील हुजूरुर-बहराइच रेल्वे क्रॉसिंगच्यावेळी झाला आहे. बुधवारी सकाळी, कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील भरधाव फॉर्च्युनरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर दोन युवक जात होते. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार दोन्ही तरुण कित्येक मीटर अंतरावर पडले. दोन पादचाऱ्यांनाही वाहनाची धडक बसली.अपघातात फॉर्च्युनर गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाडीचे एअरबॅग्स उघडले गेले होते. घटनास्थळावरुन ताफ्यातील सर्व लोकं फरार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातवरण पसरले आहे. लोकांनी सामुदायिक आरोग्य केंद्राला घेराव घातला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीसांचा ताफा बोलावण्यात आला आहे.
वाहनाच्या धडकेमुळे गाडीचा पुढच्य़ा भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अपघातात दुचाकीस्वार रेहान खान(17) आणि शहजाद खान(24) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचवेळी गंभीर जखमी झालेल्या सीतादेवीला दुसरे रुग्णालय रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List