बाय बाय भाजप! गुड बाय मोदी; राहुल गांधी यांची मोठी भविष्यवाणी

बाय बाय भाजप! गुड बाय मोदी; राहुल गांधी यांची मोठी भविष्यवाणी

लोकसभा निवडणुकीचा अखेरच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्व पक्ष प्रचारात झोकून देत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील पूर्वांचलच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी 4 जून रोजी लागणाऱ्या लोकसभा निकालांबाबत मोठी आणि महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. आता 4 जूनननंतर बाय बाय भाजप! गुड बाय मोदी असे राहुल गांधी म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी एक्सवर ट्विट केले आहे.

या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हचले आहे की, 4 जूननंतर Good Bye BJP, Good Bye नरेंद्र मोदी, Tata! आता जनतेची फसवणूक करणाऱ्या नकली फकीराकडे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. INDIA आघाडीला मते मिळत आहेत खटाखट खटाखट! भाजपपासून देशाला मुक्ती मिळणार, खरे अच्छे दिन येणार फटाफट!,असे ट्विट करत राहुल गांधी यांनी 4 जूननंतरची भविष्यवाणी केली आहे.

आता इंडिया आघाडीत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आहेत. सायकलवर पंजाची मजबूत पकड असते. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. भाजपचा सुपडा साफ होणार आहे. तर इंडिया आघाडीकडे जागांची लाईन लागणार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्ये 13 जागांवर मतदान होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;