राजकोट अग्निकांड प्रकरण – गेम झोन मालकाच्या मृत्यूची पुष्टी; डीएनए त्याच्या आईशी जुळला

राजकोट अग्निकांड प्रकरण – गेम झोन मालकाच्या मृत्यूची पुष्टी;  डीएनए त्याच्या आईशी जुळला

गुजरातच्या राजकोट शहरातील टीआरपी गेमझोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत गेमझोनचे मालक प्रकाश किरण यांचाही मृत्यू झाल्य़ाची पुष्टी करण्यात आली आहे. या आगीत मुलांसह 30 लोकांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी डीएनए टेस्टच्या माध्यमातून प्रकाश हिरन यांची ओळख पटली आहे. घटनास्थळावर मिळालेल्या अवशेषांवरुन प्रकाश यांच्या आईच्या डीएनएशी जुळला आहे.

प्रकाश हिरन हे टीआरपी गेम झोनचे 60 टक्के शेअरधारक होते. आग लागण्याच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकाश यांना घटनास्थळी पाहण्यात आले होते. प्रकाश यांचे भाऊ जितेंद्र हिरन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर प्रकाश यांच्याशी काहीच संपर्क झालेला नाही. सर्व फोन बंद येत आहेत आणि प्रकाश यांची कार आग लागलेल्या जागीच आहे.

जितेंद्र यांच्या तक्रारीनंतर, कुटुंबाकडून डीएनए नमुने घेण्यात आले. डीएनए चाचण्यांनी पुष्टी केली की आग लागल्यानंतर ज्यांचे अवशेष सापडले त्यात प्रकाश यांचा समावेश आहे. गेम झोनमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी हिरणसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वास्तविक, राजकोट आगीनंतर मृतांच्या नातेवाइकांची डीएनए चाचणी केली जात आहे,मात्र आतापर्यंत केवळ 20 मृतदेहांची ओळख पटली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;