सांगलीतील तासगावमध्ये अल्टो कार कालव्यात कोसळली; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील तासगाव ते मणेराजुरी मार्गावर अल्टो कार कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगी जखमी आहे. अपघातातील मृत हे तासगावमधील सिव्हिल इंजिनियर राजेंद्र जगन्नाथ पाटील यांचे कुटुंबीय आहेत. अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील, पत्नी सुजाता राजेंद्र पाटील, मुलगी प्रियांका अवधूत खराडे, नात ध्रुवा, राजवी, कार्तिकी अशी मृतांची नावे आहेत. स्वप्नाली विकास भोसले ही लहान मुलगी अपघातात जखमी झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List