माउंट एव्हरेस्टवर फडकला महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज! द्वारका डोखे ठरल्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी
माउंट एव्हरेस्टचं शिखर सर करणं हे आज देखील एक मोठं आव्हान आहे. अशातच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्राचे नाव मोठं केलं. तसेच एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत.
माउंट एव्हरेस्ट शिखरावर फडकला महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज!
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्राचे नाव मोठे केले.#ProudMaharashtraPolice#MountEverest #ProudMoment pic.twitter.com/0Sgui6op5u
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 29, 2024
पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी 2022 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. पण हायर अल्टीट्युड पल्मनरी एडेमाचा त्रास झाल्यानं त्यांना परत फिरावं लागलं होतं. पण ‘कोशीश करने वालोंकी हार नही होती’ या पक्तींना प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय करून दीड वर्ष त्यांनी स्वत:वर प्रचंड परिश्रम घेतले. 2024 मध्ये पुन्हा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निश्चय केला. दोन महिन्यांच्या प्रवासानंतर 22 मे 2024 रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List