‘नताशासोबत राहणं म्हणजे…’, हार्दिक पांड्या पूर्वीपासून होता पत्नीमुळे हैराण? व्हिडीओ व्हायरल

‘नताशासोबत राहणं म्हणजे…’,  हार्दिक पांड्या पूर्वीपासून होता पत्नीमुळे हैराण? व्हिडीओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिच्यासोबत होत असलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या फक्त नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण इंटरनेटवर हार्दिक याचं एक वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे. नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम लागतो…. असं हार्दिक म्हणाला होता. ज्यामुळे हार्दिक पूर्वीपासून पत्नीमुळे हैराण होता का? अशा चर्चा देखील रंगल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर हार्दिक – नताशा यांच्या लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हार्दिक – नताशा स्वतःच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहे. लग्नाच्या वेळी हार्दिक म्हणाला होता, ‘ज्याप्रकारे नताशा हिने माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी माझ्यासाठी स्पष्ट झाल्या आहेत. कठीण काळत धैर्य कसा बाळगावा हे नताशाने मला शिकवलं आहे.’

‘लव्ह लाईफमुळे मला माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत… मी पूर्वीपेक्षा अधिक संयमी झालो आहे. कारण नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम लागतो…. ‘ असं हार्दिक म्हणाला होता. सांगायचं झालं तर, नताशा हिने इन्स्टाग्रामवरून ‘पांड्या’ नाव काढल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. पण हार्दिक आणि नताश खरंच विभक्त होणार आहेत का? यावर त्यांनी आणि कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

हार्दीक आणि नताशा यांचं लग्न

हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांना 2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर नताशा हिने मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. पांड्या कुटुंब चाहत्यांना देखील आवडत होतं. त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. एवढंच नाहीतर, हार्दिक, नताशा हिच्या कुटुंबियांना देखील लग्नाच्या दोन वर्षांनंतर भेटला होता.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा हिला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. तिचा नवा बॉयफ्रेंड असेल.. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान, नताशा हिला घटस्फोटाच्या चर्चांबद्दल देखील विचारण्यात आलं. पण नताशा हिने बोलणं टाळलं. नताशा फक्त ‘थँक्यू सो मच’ हे दोन शब्द म्हणाली आणि त्या मिस्ट्री मॅनसोबत निघून गेली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;