गोरेगाव येथे महिलेची हत्या; प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला महिलेचा मृतदेह

गोरेगाव येथे महिलेची हत्या; प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला महिलेचा मृतदेह

गोरेगाव येथे महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दिव्या टोप्पो असे मृत महिलेचे नाव आहे. फरार आरोपीने दिव्याची हत्या करून तिचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळला होता. दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याने घरात पंखा आणि कुलर चालू ठेवला होता. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

दिव्या ही मूळची ओडिशाच्या सुंदरगढच्या सुरुलता सुंजोरे गावातील आहे तर फरार आरोपीदेखील त्याच गावात राहत होता. गेल्या दीड वर्षापासून ते गोरेगाव पूर्वच्या अशोकनगर येथील कामा इस्टेट येथे भाडय़ाने राहत होते. भाडय़ाने घर घेतले तेव्हा फरार आरोपीने दिव्या ही तिची पत्नी असल्याचे सांगितले होते. 20 हजार डिपॉझिट आणि पाच हजार रुपये प्रतिमहिना भाडय़ाने ते दोघे राहत होते. ते दोघे गोरेगावच्या नेस्को येथे मजूर म्हणून काम करत होते. गेल्या आठवडय़ात फरार आरोपीने घराचे भाडे भरले. त्यानंतर त्याला कोणीच पाहिले नाही. त्या घराला टाळे होते आणि घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने याची माहिती वनराई पोलिसांना दिली. स्थानिकांनी ते घर उघडले तेव्हा दिव्याचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला होता. काही वेळाने वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामप्यारे राजभर, पोलीस निरीक्षक सचिन परदेशी, उपनिरीक्षक इंद्रजित भिसे आदी घटनास्थळी आले.

दिव्याची गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी पोलिसांना एक नायलॉनची रस्सी सापडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;