झोपडपट्टी परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी नि:शुल्क करा! शिवसेनेची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

झोपडपट्टी परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी नि:शुल्क करा! शिवसेनेची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीतील धोकादायक, सुकलेल्या झाडांची छाटणी किंवा तोडण्याचे काम निःशुल्क करावे आणि झोपडीवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

पावसाळा सुरू होण्याआधी पालिका रस्त्यालगतची धोकादायक झाडे छाटण्याचे काम पंत्राटदारांकडून करवून घेते. रहिवासी सोसायटी, खासगी इमारत आणि झोपडपट्टय़ांमधील धोकादायक आणि सुकलेल्या झाडांची छाटणी आणि तोडकामासाठी रहिवाशांना परवानगी देते. त्यानंतर मंजूर निविदेतील दर आणि 20 टक्के प्रशासकीय शुल्क आकारून झाडे छाटली जातात.

…तर दुर्घटना टळतील
पालिका पूर्वी झोपडपट्टय़ांलगतची धोकादायक झाडांची छाटणी निःशुल्क करत होती, मात्र आता त्यासाठी पैसे आकारले जातात. गेल्या काही वर्षांत मुंबईत अतिवृष्टीमुळे झाडे उन्मळून पडल्यामुळे कित्येक मुंबईकरांनी जीव गमावला. भविष्यात अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात. त्यासाठी झोपडपट्टीतील आणि नजीकच्या धोकादायक, सुकलेल्या झाडांची छाटणी आणि तोडणी पालिकेने मोफत करावी. याबाबत वृक्ष प्राधिकरणाला परिपत्रक काढून आदेश द्यावा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;