गुरूने शिष्येचा गळा घोटला, ठाण्यात कबड्डीपट्टू तरुणीची हत्या; प्रशिक्षकाला नवी मुंबईतून अटक
गुरूच क्रूरकर्मा बनल्याची घटना ठाण्यात घडली आहे. कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव (23) याने 17 वर्षीय अल्पवयीन कबड्डीपट्टूची गळा आवळून हत्या केली असून याप्रकरणी त्याला कापूरबावडी पोलिसांनी नवीमुंबई घणसोली येथून अटक केली आहे. ती खेळाडू वारंवार मोबाईल फोनवर बोलत असल्याच्या संशयाने प्रशिक्षकाने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत अल्पवयीन तरुणी ही मिरज येथे कबड्डी खेळण्यासाठी गेली होती. तर कुटुंबातील सदस्य हे पुण्यात लग्नाला गेले होते. कबड्डी खेळून परतीच्या प्रवासात त्या तरुणीने आईला फोन केला. पुण्याला ये असे सांगितल्यानंतर तिने काम असल्याने घरी जाते असे सांगितले. गुरुवारी रात्री कोलशेत परिसरातील घरी ती पोहचली. त्यानंतर तिच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. शुक्रवारी 24 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मृतदेह सापडला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली.
या घटनेनेनंतर कापूरबावडी पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविला. दरम्यान त्या अहवालात तरुणीच्या मानेवरील खुणा आढळल्याने तिची गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबियांची चौकशी केल्यावर त्यांनी कबड्डी प्रशिक्षकावर संशय व्यक्त केला. त्यानुसार तपास केल्यावर मृत आणि आरोपी गणेश गंभीर राव यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितले. ती तरुणी मोबाईलवर वारंवार बोलत असल्याने संशयावरून तिच्या प्रशिक्षकाने हत्या केल्याचे समोर आले अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List