स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय; 69 टक्के शौचालये पाण्याविना तर 60 टक्के शौचायलांत वीज नाही
मुंबईतील स्वच्छतागृहांची स्थिती मात्र अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 69 टक्के शौचालये पाण्याविना तर 60 टक्के शौचालयांमध्ये वीज नसल्याचे समोर आले आहे. स्त्रियांसाठी शौचालयांची संख्या अपुरी असून 2023 च्या आकडेवारीनुसार दर चार सार्वजनिक शौचालयातील केवळ एक शौचालय स्त्रियांसाठी उपलब्ध आहे. एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱया पुरुषांची संख्या 752 तर स्त्रियांची संख्या 1820 इतकी आहे. याबाबत ‘प्रजा’ फाऊंडेशनने आज आपला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये प्रजा फाऊंडेशनने ‘मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती 2024’ हा अहवाल मंगळवारी प्रेस क्लब येथे प्रसिद्ध केला. या अहवालात मुंबईतील स्वच्छता व आणि वायू प्रदूषण या समस्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
हवेची गुणवत्ताही खालावलेली
2023 साली एकाही महिन्यांमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता सरासरी चांगली असल्याची नोंद झालेली नाही, असे अहवालातून समोर आले आहे. मुंबईच्या पाण्याची प्रदूषण पातळी चिंताजनकरीत्या वाढलेली आहे. पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आटोक्यात राखण्यासाठी मुंबईच्या नदी, समुद्र आणि खाडीतील पाण्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि फेकल कोली फॉर्मिन पातळी निधार्रित केली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे आठ प्लांट्स मुंबईत आहेत. तरीही अतिप्रदूषित पाण्यामुळे तटीय जैवविविधता धोक्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List