मिझोराममधील भूस्खलनात 13 ठार; ‘रेमल’ वादळामुळे दगड खाण कोसळली
‘रेमल’ वादळाचा प्रभाव ईशान्येकडील भागातही दिसून आला आहे. मिझोराममधील वादळामुळे संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी सहा वाजता आयझॉलमधील दगडाची खाण कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बेपत्ता झाले आहेत. आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी सात स्थानिक लोकांचे आहेत, तर तीन इतर राज्यांतील आहेत. ढिगाऱयाखाली अनेक लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे अडचणी येत आहेत. सततच्या पावसामुळे मिझोराममधील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी पंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱयांना घरून काम करण्यास सांगितले आहे. राज्यात इतरही अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. सालेम वेंग, आयझॉल येथे भूस्खलनानंतर एक इमारत पाण्यात वाहून गेल्याने तीन लोक बेपत्ता आहेत. हुंथरमधील राष्ट्रीय महामार्ग-6 वर भूस्खलनामुळे आयझॉलचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे. राज्यातील अनेक राज्यमहामार्गही बंद आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List