धारावीत भल्या पहाटे आगीचा भडका, सहा कामगार जखमी; गारमेंटच्या कारखान्यात आगीची ठिणगी

धारावीत भल्या पहाटे आगीचा भडका,  सहा कामगार जखमी; गारमेंटच्या कारखान्यात आगीची ठिणगी

धारावीमध्ये एका गारमेंट कारखान्यात भल्यापहाटे 3.52 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कापड सामान असल्यामुळे अवघ्या काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून ते 10 ते 50 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धारावी अशोक मिल कंपाऊंड रोडवर ही तळ अधिक सहा मजली व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गारमेंटच्या कारखान्यात मंगळवारी पहाटे आग लागली. यावेळी इमारतीतील काही कामगारांनी खाली धाव घेत आपला बचाव केला, मात्र काही कामगार दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अडकून पडले. पालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र या घटनेत सहा कामगार जखमी झाले आहे. जखमींमधील रफिक अहमद (26) हा कामगार किरकोळ भाजल्याने उपचारानंतर घरी सोडण्यात आले, मात्र पाच कामगार 10 ते 50 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सगळय़ांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जखमींची नावे
– सलमान खान (26), 10 टक्के भाजले
– मनोज (26), 10 टक्के भाजले
– अमजद (22), 45 टक्के भाजले
– सल्लाऊद्दीन (28), 50 टक्के भाजले
– सैदुल रेहमान ( 26), 40 टक्के भाजले
– रफीक अहमद ( 26), हाताला जखम

इमारत पाडण्याचे काम सुरू
या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आहे, मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्प पंपनीने दुर्लक्ष केल्याने आगीमुळे धोकादायक इमारत पालिकेने मंगळवार सकाळपासून पाडकामाची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. तर आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस, अग्निशमन दलाकडून सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;