होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे पोलीस अधिकाऱयाची चौकशी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हे शाखेच्या एसआयटीने रेल्वे पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम याना चौकशीसाठी समन्स बजावले होते. एसआयटीने समन्स बजावताच आज निकम हे चौकशीसाठी हजर झाले. रात्री उशिरा पर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
भावेश हा दादर आणि घाटकोपर येथील हार्ंडगसाठी 30 लाख रुपये देत होता. या गुह्याच्या सखोल तपास सुरू असल्याने एसआयटीने रेल्वे पोलीस दलाचे सहायक पोलिस आयुक्त याना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज शहाजी निकम हे चौकशीसाठी आले होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यानी ही चौकशी केली. हार्ंडगसाठी कधी परवानगी देण्यात आली होती. कोणत्या कागद पत्रावर कोणाच्या स्वाक्षरी होत्या, या बाबत चौकशी केल्याचे समजते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List