दादा गटाचे कमळाबाईशी खटके!

दादा गटाचे कमळाबाईशी खटके!

राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून वेगळा संसार थाटलेल्या अजित पवार गटाचे आता कमळाबाईशी पटेनासे झाले आहे. रोज काही ना काही कारणावरून खटके उडू लागले आहेत. छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या 80-90 जागा मागितल्यानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. उगीच काहीही विधाने करून धुके निर्माण करू नका, सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपलाच जास्त जागा मिळतील, असे भाजप नेत्यांनी सुनावले आहे.

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक मुंबईत झाली. त्यात छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपने 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिला असल्याची आठवण करून दिली होती. भाजपकडून त्या हक्काने मागून घ्या, लोकसभेवेळी झाली तरी खटपट नको, नाहीतर भाजपवाले म्हणतील तुमच्या 50 आहेत तर 50 घ्या आणि मग त्यातून निवडून किती येतील? असे भुजबळ यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भुजबळांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा इतरांचे काही मत असेल तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असे ते म्हणाले. आश्वासन दिल्याचे कोणतेही पुरावे नसतात, तरीही कुणी शब्द दिला असेल तर त्या नेत्याचे नाव सांगा, उगीच धुके पसरवून समस्या वाढवू नका, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी तर भाजप मोठा पक्ष असल्याने जास्त जागा भाजपलाच मिळतील असे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तीनही पक्षाला जागा मिळतील असे सांगतानाच, महायुतीमधील इतर दोनही पक्षांचा सन्मान केला जाईल, अशी सारवासारवही फडणवीस यांनी केली. अन्य एका भाजप नेत्याने तर युती बिघडवण्याची भाषा केलीत तर सहन करणार नाही, अशी धमकीच भुजबळांना दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;