होय, मोदींना देवानेच पाठवलंय, अदानी-अंबानींना मदत करायला!

होय, मोदींना देवानेच पाठवलंय, अदानी-अंबानींना मदत करायला!

मोदींच्या देवाने मोदींना सांगितले, अदानींची मदत करा. अंबानींची मदत करा. हिंदुस्थानातील सगळे एअरपोर्ट अदानींना द्या. पॉवर प्लांट, रेल्वे अदानींकडे सोपवा. अदानी-अंबानींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ करा. हा कसा देव आहे. हा मोदीवाला देव आहे.

माझा जन्म बायोलॉजिकल नाही, मला देवाने पाठवले आहे’, असे विधान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा लक्ष्य केले. ‘होय, मोदींना देवानेच पाठवलंय पण गरिबांच्या कल्याणासाठी नाही तर अदानी आणि अंबानींना मदत करण्यासाठी पाठवले आहे,’ असा सणसणीत टोला राहुल यांनी लगावला.

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदींच्या दाव्यांची खिल्ली उडवली. ‘मोदी म्हणतात, अरे चमच्यांनो, हा मोदी काहीच करत नाही. सगळं आपोआप होतं. मला भूतलावर देवाने पाठवले आहे. बाकी सगळे बायोलॉजिकल आहेत. आईवडिलांपासून जन्माला आलेत पण मी वरून टपकलो आहे. देवाने त्याचे काम करायला मला हिंदुस्थानात पाठवले आहे.’ मोदींचे हे म्हणणे खरे असेल तर त्यांना देवाने अदानी आणि अंबानींचे काम करायला पाठवले आहे का? हे सगळं अजबच आहे, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींचा समाचार घेतला.
गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करायला हवी!

मोदींना खरेच देवाने पाठवले असते तर देव त्यांना म्हणाला असता, हिंदुस्थानातील दुर्बलाची मदत करा. शेतकरी, मजूर, गरिबांना मदतीचा हात द्या, पण तसे झाले नाही, असे नमूद करत मोदींच्या अदानी-अंबानी प्रेमावर राहुल यांनी प्रहार केला.
– ‘4 जूननंतर गुड बाय भाजपा… गुड बाय नरेंद्र मोदी! जनतेला लुटणाऱया नकली फकिराकडे आता फक्त सात दिवस उरलेत. इंडियाला मते मिळत आहेत खटाखट, भाजपपासून देशाला मुक्ती मिळणार आणि अच्छे दिन येणार फटाफट’ अशी फटकेबाजीही राहुल गांधी यांनी केली.

वाचा, मोदी काय म्हणतात…
‘माझ्या नशिबात शिव्या-शाप आणि अपमान लिहिलेलाच आहे. हे राजकारणात आल्यावर म्हणतोय असे नाही. मी लहानपणापासूनच असे आयुष्य जगत आलो आहे. सामान्य आयुष्यातही मी अनेक अपमान सहन केले. मी कप-बशा धुवायचो. छोटंसं दुकान होतं. चहा थंड झाला तर मला ओरडा पडायचा, रागाने मालक माझ्या कानाखाली मारायचा. हे सगळं मी सहन केलं आहे, असे विधान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

मोदी देवांचेही राजा
नरेंद्र मोदी हे सुरेंद्र मोदी आहेत, केवळ नरांचे नाही तर ते सूरांचेही नेते आहेत, असे आता सगळेच बोलत आहेत. देवही शुभ विचार करतो आहे. देवाची भाषा तुम्ही समजून घ्या. मोदी लोकांचेच नाही, देवांचेही राजे आहेत, असे विधान आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. या विधानावरून ते सोशल मीडियात चांगलेच ट्रोल होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;