बाबा रामरहीमची खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू गुरमित रहीम याची 2002 मधील खून प्रकरणातून पंजाब आणि हरियाणा कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. परंतु, अन्य खटल्यांत रहीमला 20 वर्षांची शिक्षा झाली असल्याने त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. डेराचा मॅनेजर रणजित सिंग याची 2002 मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपातून रामरहीमची सुटका करण्यात आलीय. याप्रकरणात सीबीआयने रहीमला 2021 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच 31 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. हायकोर्टाच्या निकालानंतरही राम रहीम रोहतकच्या तुरुंगातच राहणार आहे. 2002 मध्ये पत्रकार राम चंदर छत्रपती यांच्या हत्येच्या आरोपात रहीमला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तसेच शिष्य महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपात दोषी आढळला असून यातही राम रहिमला 20 वर्षांची शिक्षा झालेली आहे.
9 वेळा पॅरोल मंजूर
राम रहीमला 2017 मध्ये शिक्षा झाल्यानंतर अनेकदा पॅरोल मंजूर झाला आहे. गेल्या चार वर्षांत त्याला 9 वेळा पॅरोल मंजूर करण्यात आलाय. पॅरोलवर सुटल्यानंतर राम रहीमने दोन वेळा आपला सत्संग भरवल्याचेही उघड झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List