गांजा सापडूनही विद्यापीठ सुस्तच! शिवसेना आणि काँग्रेसने कुलगुरूंना विचारला जाब
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहात गांजा सापडूनही विद्यापीठ प्रशासन सुस्तच आहे. या घटनेला तेरा दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने अखेर आज शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी तसेच आमदार रवींद्र धंगेकर यांनी विद्यापीठात धडक मारून कुलगुरुंना याचा जाब विचारला. या प्रकारची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा अधिवेशनात आवाज उठवू, असा सज्जड दम अंधारे आणि अंधेकर यांनी कुलगुरुंना दिला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू विजय खरे यांच्याशी सुषमा अंधारे, रवींद्र अंधेकर, गजानन थरपुडे, राम थरपुडे यांच्यासह पदाधिकाऱयांनी चर्चा केली.या चर्चेनंतर सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, विद्यापीठातील गांजा प्रकरणाबद्दल गुन्हा दाखल झालाच पाहिजे. हे प्रकरण लपविण्यासाठी ज्या कर्मचाऱयांनी पुढाकार घेतला त्यांना निलंबित करून त्यांची वेगळी चौकशी करावी. तसे न झाल्यास येत्या अधिवेशनात आम्हाला आवाज उठवावा लागेल.
चौकशी समिती नेमा
याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन करावी. समितीमध्ये सर्वपक्ष, संघटना व माध्यमप्रतिनिधींचा समावेश असावा असे अंधारे म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List