काळजी घ्या, पुढचा साथरोग येण्याच्या मार्गावर; ब्रिटनमधील वैज्ञानिकांचा इशारा
कोरोनासारख्या साथीतून संपूर्ण जग बाहेर येत असतानाच आता आणखी एक साथरोग येण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा ब्रिटनचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक व्हॅलेन्स यांनी दिला आहे. त्यादृष्टीने सरकारने तो रोखण्यासाठीच्या तयारीला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ाgढील साथरोग येण्याचा धोका ओळखून तो रोखण्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे असल्याचे व्हॅलेन्स यांनी म्हटले आहे. रोगाचे निदान सोप्या पद्धतीने करता येईल,त्यादृष्टीने कठोर उपाययोजना करायला हवा. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समन्वय गरजेचा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List